शिवरायांबद्दल अपशब्द वापरणारा भाजपचा अहमदनगरमधील निलंबित उपमहापौर श्रीपाद छिंदमला नागरिकांनी गुन्हे अन्वेषण विभागाच्या ताब्यात दिलं. शनिवारी कोर्टात हजर केल्यानंतर छिंदमला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.छिंदमची रवानगी एक मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.शहर जिल्हाध्यक्ष आणि खासदार दिलीप गांधी यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्यावा किंवा पक्षाची कार्यकारिणी बरखास्त करावी अशी मागणी भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य अभय आगरकर यांनी केली आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews